आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये बळजबरी विवाह रोखणारा ‘फ्रीडम ’अ‍ॅप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - बळजबरीने होणारे विवाह रोखण्यासाठी ब्रिटन सरकारने मोबाइलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील भारतीय वंशाच्या नागरिकांसह अनेक समुदायांत अशा प्रकारचे विवाह होतात. ते रोखण्यासाठी आता मोबाइल अ‍ॅपचा उपयोग होणार आहे. सरकारने त्यासाठी विशिष्ट स्मार्टफोन निर्मितीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अ‍ॅप ला ‘फ्रीडम’ असे नाव देण्यात आले आहे. अ‍ॅप तयार करण्यासाठी ब्रिटन सरकारने स्कॉटलंड यार्डकडून इनपुट घेतले आहेत. युजरने अ‍ॅपला केवळ दोन वेळा क्लिक केल्यानंतर त्याला मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश वंशातील मुलींना बळजबरी विवाहाला सामोरे जावे लागते.