आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनंदिन स्मार्टफोन वापराचा लेखाजोखा देणारा अँप तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - स्मार्टफोनचे भूत तुमच्या डोक्यात चढले काय? याचे उत्तर होकारार्थी असेल तर त्यातून सुटका करण्यासाठी नव्या अँपची तुम्हाला मदत होईल. स्मार्टफोनचा दैनंदिन वापर समजण्यासाठी नवे अँप विकसित करण्यात आले आहे. या अँपचे नाव मेंथॉल असून युर्जस साधारण दर 12 मिनिटांनी स्मार्टफोनचा वापर करत असल्याचे दिसून आले.
जर्मनीतील बॉन विद्यापीठातील संशोधकांनी अँप विकसित केले असून त्यातून दररोज स्मार्टफोनचा वापर किती केला तसेच कोणत्या अँप्सचा सर्वाधिक वापर झाल्याचे कळते. तुम्हाला डिजिटल डाएटवर जाण्याची इच्छा असेल तर आम्ही त्याची स्केल पुरवू, असे बॉन विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विषयाचे कनिष्ठ प्रोफेसर अलेक्झांडर मार्कोवेत्झ यांनी सांगितले.
सेलफोन वापराबाबत दीर्घकाळ करण्यात आलेल्या प्रोजेक्टमधून या अँपची निर्मिती झाली आहे. सेलफोन वापराबाबत युर्जसकडून विविध अभ्यास करण्यात आले. मात्र त्याचे निष्कर्ष विश्वासपात्र नाहीत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. मेंथॉलमधून पहिल्यांदाच विश्वासार्ह डाटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अँपमधून एखाद्याच्या स्मार्टफोन वापराची नेमकी माहिती कळू शकेल, असे मार्कोवेत्झ म्हणाले.
संशोधकांनी 50 विद्यार्थ्यांच्या सहा आठवडे स्मार्टफोन वापरावरून निष्कर्ष तयार केले. यातील एक चतुर्थांश विद्यार्थी दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त स्मार्टफोनचा वापर करत होते. अभ्यासात सहभागी विद्यार्थी दिवसभरात 80 पेक्षा जास्त वेळेस फोन वापरत होते. दिवसभरात साधारण दर 12 मिनिटांनी स्मार्टफोनचा वापर होत असल्याचे दिसून आले. फोनचा वापर केवळ बोलण्यासाठी होणे अभिप्रेत आहे, मात्र या विद्यार्थ्यांपैकी निम्मे अध्र्याहून अधिक वेळ मेसेंजर किंवा सोशल नेटवर्किंगवर घालवत असल्याचे समोर आले.
सायबर गुन्हेगारीवर टाच, बनावट फेसबुक अकाउंट शोधणार अँप
सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून वाढणार्‍या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बनावट फेसबुक अकाउंट ट्रॅक करू शकणारे अँप विकसित करण्यात आले आहे. फेकऑफच्या अँपमधून फ्रेंडलिस्टमध्ये शिरकाव करणार्‍या बनावट युर्जसना आळा घातला जाईल. ताज्या आकडेवारीनुसार 1 अब्ज 35 कोटी फेसबुक युर्जस विश्वासार्ह नसल्याचे उघड झाले आहे. बनावट अकाउंटद्वारे अनेक जण नियमित युजर असल्याचे दाखवतात, असे फेकऑफचे निर्माते इलिरॅन शाचर यांनी सांगितले. फेक प्रोफाइल्स गुन्हेगार, व्यावसायिक व मानसिक गटात विभागले आहेत.