आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अॅपल\'चा नवा विश्वविक्रम : 3 महिन्यांत 128 देशांच्या GDP पेक्षा जास्त कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- जगातील सर्वात मूल्यवान कंपनी अॅपलने बुधवारी नवा विश्वविक्रम रचला. बुधवारी जाहीर झालेल्या अहवालानुसार कंपनीने केवळ तीन महिन्यांत सुमारे १.१ लाख कोटी रुपये (१८ अब्ज डॉलर्स) नफा कमावला. गतवर्षाच्या तुलनेत ३८% जास्त. आयफोन-६ व आयफोन- ६ प्लसच्या प्रचंड विक्रीमुळे हे शक्य झाले. या तीन महिन्यांत (ऑक्टोबर-डिसेंबर) कंपनीने ७.४५ कोटी म्हणजेच तासाला सरासरी ३४ हजार फोन विकले. यामुळे कंपनीचे उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढून ४.५७ लाख कोटींवर (७४.६ अब्ज डॉलर्स) पोहोचले. संयुक्त राष्ट्राच्या २०१३ मधील आकलनानुसार १९४ देशांपैकी केवळ ६६ देशांचा जीडीपी ७४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. म्हणजेच उर्वरित १२८ देशांचा जीडीपी अॅपलच्या तिमाही उत्पन्नापेक्षाही कमी आहे.

ही ऐतिहासिक कमाई
येत्या तिमाहीत नफा ५२ वरून ५५ अब्ज डॉलर्सवर जाऊ शकतो. येत्या एप्रिलमध्ये अॅपल वॉच लाँच केली जाईल.- टीम कुक, सीईओ, अॅपल
आकडे चकित करणारे
अॅपलने प्रत्येक व्हर्जनच्या विक्रीत विक्रम केला आहे. २०१३ मध्ये ५एस व ५ सी मॉडेल लाँच केल्यानंतर ५ कोटी फोन विकले. - लुका मॅस्ट्री, सीएफओ, अॅपल

जगभरात ताशी सरासरी ३४ हजार आयफोन-६, आयफोन-६ प्लसची विक्री
या तिमाहीत भारतात १००%,
चीनमध्ये ७०% विक्री वाढली
१०.९४ लाख काेटी राेकड
४० लाख कोटींच्या अॅपलकडे रोख रक्कमच १०.९४ लाख कोटी रु. इतकी आहे. या रकमेतून कंपनीला आयबीएम (मार्केट कॅप ९.३४ लाख कोटी रु.) ही सॉफ्टवेअर कंपनी विकत घेता येईल.
कुठून किती कमाई
दिवाळीत लाँच होताच भारतात ३ दिवसांत ५५ हजार फोन विकले.
चीनमध्येही आयफोन विक्री ७०% वाढली.
सिंगापूर-ब्राझील: विक्रीत दुप्पट वाढ.

भारतीय कंपन्यांशी तुलना
अॅपलकडील रोकड : १०.९४ लाख कोटी. दुसरीकडे, टॉप-३ भारतीय कंपन्यांचे मार्केट कॅप : १०.९२ लाख कोटी रुपये.
आणि टॉप-५ भारतीय आयटी कंपन्यांचे मार्केट कॅप :
१०.७८ लाख कोटी रु.
टीसीएस ४,९६,४७९ कोटी रु.
इन्फोसिस २,४६,३५८ कोटी रु.
विप्रो १,४९,७८३ कोटी रु.
एचसीएल टेक १,१६,५६२ कोटी रु.
टेक महिंद्रा ६८,८९५ कोटी रु.