आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arab Nation Wants Airstrike On Isis And Islamic State

ISIS च्या खात्म्यासाठी अनेक अरब देशांनी केले अमेरिकेच्या हवाईहल्ल्याचे समर्थन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक अरब देशांनी इस्लामिक स्टेटचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेला हवाईहल्ला करण्यास पाठिंबा दिला आहे. सिरियामध्ये अत्यंत वेगाने पाय पसरवणा-या ISIS च्या दहशतवाद्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे असल्याचे अरब राष्ट्रांचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी केलेल्या मध्य पूर्वेकडील देशांच्या दौ-यात अनेक नेत्यांनी हवाई हल्ल्याचे समर्थन केले आहे. इस्लामिक स्टेटच्या विरोधात कारवाई करण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी केरी हे बगदाद, अम्मान, जॉर्डन, जिद्दा, सौदी अरब, अंकारा, तुर्कस्तान आणि काहिराच्या दौ-यावर गेले होते. गेल्या गुरुवारी जिद्दा येथे दहा अरब देशांनी संयुक्त प्रतिक्रिया दिली होती. त्यात अमेरिकेला पाठिंबा दर्शवण्यात आला होता.
फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियानेही सिरियामध्ये हवाईहल्ला करण्यास पाठिंबा दर्शवला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबॉट यांनी त्यांच्याकडील एफए-18 फाइटर प्लेन पाठवणार असल्याचे म्हटले आहे. संयुक्त अरब अमिरातहून ते ऑपरेट केले जाईल. तसेच 200 सैनिक आणि कमांडो पाठवण्याची तयारीही दर्शवली आहे. हे कमांडोज इराक आणि कुर्दीश सेनेला सल्ला देण्याचे काम करेल.