आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arearoplan Crashed On Runway In Sanfrancisco, 2 Dead, 181 Injured

सॅन फ्रान्सिस्कोमध्‍ये विमानाची धावपट्टीवर धडक; 2 ठार, तर 181 जण जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को - 307 जणांना घेऊन लँड होणारे एशियाना एअरलाइन्सचे विमान शनिवारी रात्री धावपट्टीवर आदळले. त्यानंतर विमान पेटले. अपघातात 2 जण ठार, तर सुमारे 181 जण जखमी झाले. सुदैवाने विमानातून प्रवास करणा-या तीन भारतीयांसह सुमारे 305 जण बालंबाल बचावले.


बोइंग 777 (फ्लाइट ओझेड 214) या दक्षिण कोरियन विमान कंपनीच्या पेटलेल्या विमानातून 300 प्रवासी बाहेर पडू शकले. 181 जणांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. एका मुलासह पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. हे विमान सेऊल ते सॅन फ्रान्सिस्को जाणारे होते. विमानात तीन भारतीय होते. त्यातील एकास फ्रॅक्चर झाल्याची माहिती दक्षिण कोरियातील भारतीय राजदूत विष्णू प्रकाश यांनी दिली. प्रकाश यांनी ट्विटरवरून हे जाहीर केले. विमानाच्या शेपटाच्या भागाचे धावपट्टीवर घर्षण झाल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. घटनेनंतर विमानाचे छत पूर्णपणे कोसळले होते, असे विमानातील बचावलेल्या एका लहान मुलाने सांगितले. ही घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेअकराची आहे. विमानात 16 कर्मचारी, 291 प्रवासी होते. त्यात 141 चिनी, 77 दक्षिण कोरिया, 61 अमेरिकेचे प्रवासी होते. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या टीमला घटनेवर बारकाईने नजर ठेवण्यास सांगितले.


नेमके कारण काय ? : विमानाला अपघात का झाला, याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न एशियाना एअरलाइन्स करत आहे. घटनेच्या तपासासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही कंपनीकडून देण्यात आली आहे.


70 चिनी विद्यार्थी
अपघातग्रस्त विमानातून चीनचे 70 विद्यार्थी प्रवास करत होते. सुदैवाने ते सर्व सुखरूप आहेत. वासंतिक वर्गासाठी ही मुले अमेरिकेला जात होती. शांझी प्रांत व झिजिआंग प्रांतातील प्रत्येकी एक विद्यार्थ्यांचा गट शालेय सहलीवर गेला आहे. तो याच विमानातून प्रवास करत होता. मुले सुखरूप असल्याची खात्री झाल्याने पालकांचा जीव भांड्यात पडला. केवळ एका शिक्षकाला किरकोळ जखम झाली.


दृष्टिक्षेपात बोइंग 777
०दक्षिण कोरियातील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी विमान कंपनी.
० विमानात 291 प्रवासी, 16 कर्मचारी.
० जगातील सर्वात मोठे जुळ्या इंजिनवर चालणारे जेट.
०मुख्यत्वे 12 तासांच्या प्रवासासाठी वापर.

सेऊल ते सॅन फ्रान्सिस्को अंतर- 9012 किलोमीटर