आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Argentina Government Gives Approval To Son Of Married Gay Couple

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय आईने दिला परदेशी समलिंगी जोडप्याला मुलगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्युनॉस अ‍ॅरिस- लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनामध्ये पहिल्यांदाच विवाहित समलिंगी जोडप्याच्या मुलाला मान्यता देण्यात आली आहे. हे मूल एका भारतीय मातेच्या किरायाने घेतलेल्या उदरात जन्माला आले आहे.
अलाखेंद्रो ग्रीमब्लॉट आणि कार्लोस देर्मगेर्द या विवाहित समलिंगी पुरुष जोडप्याच्या मुलास दोन बापांचे मूल म्हणून अर्जेंटिना सरकारने अधिकृत मान्यता दिल्यामुळे हे जोडपे आनंदून गेले आहे. अर्जेंटिनामध्ये अशा प्रकारची मान्यता देण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. एका भारतीय सरोगेट मदरच्या उदरात काही आठवड्यांपूर्वीच या जोडप्याच्या टॉबियस नावाच्या या मुलाने जन्म घेतला. त्यामुळे त्याला दत्तक घेण्याच्या प्रक्रिया करण्याची वेळ या जोडप्यावर आली नाही.
दोघांपैकी या मुलाचा जैविक बाप नेमका कोण आहे याच्याशी आम्हाला काहीही घेणेदेणे नाही. आम्ही दोघेही या मुलाचा बाप समजतो आणि आमच्या जबाबदा-या पार पाडत आहोत, असे ग्रीमब्लॉट आणि देर्मगेर्द यांचे म्हणणे आहे. टॉबियसच्या अधिकृत ओळखीबाबत आक्षेप घेतला जाणार नाही.

दस्तऐवजासाठी खटाटोप
टॉबियस हा दोन अर्जेंटिनी बापांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याची कागदपत्रे वेगळी असू नये आणि त्याला कोणतीही अडचण येऊ नये अशी आमची अपेक्षा असल्याचे देर्मगेर्द यांचे म्हणणे आहे. अर्जेंटिनाच्या कायद्यात तरतूद नसतानाही ग्रीमब्लॉट आणि देर्मगेर्द एक वर्षापासून हे दस्तऐवज मिळवण्याचा खटाटोप करत होते. मुलाला जन्म देण्यासाठी त्यांनी भारताचा दौरा केला आणि मागील 21 दिवसांपासून ते दोघेही ‘आई-वडिलां’ची जबाबदारी पार पाडत आहेत.