आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Argentina News In Marathi, Military, Astela D. Carloto, Divya Marathi

सुखद धक्का: चोरी झालेल्या मुलांना शोधताना नातवाची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्यूनॉस आयर्स - लष्कराने घेऊन गेलेल्या मुलांचा शोध घेताना अचानक नातू सापडल्याचा आगळावेगळा योग एका आजीबार्इंच्या आयुष्यात आला. त्यामुळे त्यांची आयुष्याची संध्याकाळ नव्याने बहरू लागली आहे.

अर्जेंटिनातील सामाजिक कार्यकर्त्या एस्टेला डी. कार्लोटो यांची ही हकीगत. हरवलेल्या मुलांना शोधताना त्यांना आपलाच नातू सापडला. त्याची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी त्याला स्वीकारले. 1970 च्या दशकात देशातील जुंता सरकारने डाव्या विरोधकांचा बीमोड करताना दडपशाहीचा वापर केला. त्यामुळे अनेक मुले हरवली होती. हे शल्य अनेक दशके उरात ठेवून असलेल्या कार्लोटो यांना नातवाची भेट झाल्यानंतर आनंदाश्रू आवरता आले नाहीत. मुलाचा शोध घेत असताना नातू भेटल्याने त्यांना वेगळाच आनंद झाला. जुंताच्या सरकारी फौजांनी केलेल्या अत्याचारात अनेक महिला ठार झाल्या होत्या. त्यात कार्लोट यांची मुलगीही होती.

असंख्य मुले पळवली
लष्करी राजवटीत विरोधकांना चिरडण्यासाठी त्यांच्या घरात लष्कर घुसवले. हे लष्कर अमानुषपणे लहान मुलांना फरफटत घेऊन गेले. शेकडो कुटुंबांचा हा वेदनादायी अनुभव आहे. ही मुले जुंताने आपल्या समर्थकांना देऊन टाकल्याचे सांगण्यात येते.
एनजीओमुळे योग : कार्लोट आणि नातवाची भेट घडवून देण्यात एनजीओची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. ‘दि ग्रँडमदर्स ऑफ दि प्लाझा डी मायो’ नावाच्या संस्थेने तुरुंग आणि छळ छावण्यांत जन्माला आलेल्या शेकडो मुलांना त्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांची भेट घडवून आणली आहे. कार्लोट यांच्या नातवासह आतापर्यंत 114 मुलांना शोधण्यात यश आल्याचा दावा एनजीओने केला आहे.

सरकारची दडपशाही
अर्जेंटिनामध्ये 70 च्या दशकात लष्करशाही होती. त्यात विरोधी विचारांच्या समुदायावर प्रचंड अन्याय केला जात असे.

30 हजार डाव्या कार्यकर्त्यांची हत्या