कॅलिफोर्नियातील सेंट्रल व्हॅलीमध्ये स्थलांतरित हंसांच्या थव्याचे हे छायाचित्र पीटर एसिक या छायाचित्रकाराने टिपले आहे. पीटर उत्तम वाइल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात. येथील सेन जोव्हाईन नदीमध्ये सातत्याने घटत चाललेल्या पाण्यासंदर्भात तसेच या पाण्यावर अवलंबून असणा-या स्थलांतरित पक्ष्यांची अवस्था दर्शवणारी वस्तुस्थिती या छायाचित्राद्वारे मांडली आहे.
तसे पाहता, दरवर्षी येथे हंस येत नाहीत, परंतु आजूबाजूच्या परिसरात आटत चाललेल्या पाण्यामुळे त्यांनी सेंट्रल व्हॅलीऐवजी या ठिकाणी
आपला तळ ठोकला. कारण येथे थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध असते.
nationalgeographic.com