हाँगकाँग - गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकशाही समर्थकांच्या आंदोलनाला गुरुवारी दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांच्या छावण्या हलवून कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने धरपकड करण्यात आली. अटकेची कारवाई करून शहरातील महत्त्वाच्या मार्गाला मोकळे करण्याची मोहीम राबवण्यात आली.
पोलिसांनी गुरुवारी आंदोलकांना ठिकाण सोडून निघून जाण्याचा इशारा दिला. त्यासाठी केवळ तीस मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली. असंख्य तरुणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रमुख मार्टिन ली, विद्यार्थी नेते नाथन लॉ, मीडिया टायकून जिम्मी लाई, गायक डेनिस हो यांचाही समावेश आहे. आंदोलनात समाविष्ट नामवंत व्यक्तींनाही पोलिसांनी अटक केली. आंदोलकांनी पोलिसांच्या कृतीचा घोषणाबाजी करून निषेध केला.
घटनाक्रम
>२८ सप्टेंबर : ‘ऑक्युपाय सेंट्रल’ला सुरुवात, अनेक नागरिकांचा सहभाग
> ऑक्टोबर मध्य : अनेक रॅली आंदोलनात सहभागी.
> २१ ऑक्टोबर : विद्यार्थी-सरकार यांच्यात चर्चा निष्फळ
> २६ नोव्हेंबर : एक छावणी हटवल्यानंतर संघर्ष.
> ०३ डिसेंबर : ‘ऑक्युपाय सेंट्रल’च्या नेत्यांचा पोलिसांसमोर जबाब
निवडणुकीची मागणी
२०१७ मध्ये होणा-या नेता निवडीमध्ये चिनी सरकारचा हस्तक्षेप असू नये, अशी स्वायत्त बीजिंग समर्थकांची मागणी आहे; परंतु चिनी सरकार त्यासाठी तयार नाही. बीजिंगमधील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येईल; परंतु त्यांना विशिष्ट समितीकडून परवानगी घ्यावी लागते.