आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arrest Of Pakistani Prime Minister Raja Parvez Ashraf Delayed

पाक पंतप्रधानांची अटक टळली, पुरेसे पुरावे नसल्‍याचा अधिका-यांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानचे पंतप्रधान राजा परवेज अश्रफ यांची अटक टळली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्‍यांना अटक करण्‍याचे दिलेले आदेश मानण्यास तेथील नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोचे अध्यक्ष फसीह बुखारी यांनी नकार दिला आहे. बुखारी यांनी पंतप्रधानांना क्‍लीन चिट दिली असून अश्रफ यांच्‍याविरोधात पुरेसे पुरावे नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

अश्रफ देशाचे जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री असताना विद्युत ऊर्जा प्रकल्प उभारणीच्या कामात 22 अब्‍ज रुपयांच्‍या घोटाळ्याप्रकरणी त्‍यांना अटक करण्‍याचे निर्देश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले होते. मात्र नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरो या देशातील भ्रष्टाचारविरोधी आयोगाचे अध्यक्ष फसीह बुखारी यांनी अटकेस नकार दिला. बुखारी यांच्या मते पंतप्रधानांना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे त्यांच्याजवळ नाहीत. अश्रफ यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यास पुरेसा पुरावा आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी न्यायालयाने या खटल्यासंबंधी कागदपत्रे न्यायाधीशांना परत करण्याची सूचना गुरुवारी केली.