आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Admiral Michel Harvard, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणादायी: समुद्रात सोमालियन चाच्यांच्या तावडीतून अमेरिकी कॅप्टनची साहसाने केली सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी हवाई दलात सार्जंट पदावर असलेल्या क्लॉरेन्स हॉवर्ड यांच्या पोटी जन्मलेल्या मिशेल यांना लहानपणापासूनच पित्याच्या विशिष्ट गणवेशाबद्दल प्रचंड आकर्षण होते. "मी पण असा गणवेश परिधान करू शकते?', अशी विचारणा ती नेहमी पित्याकडे करत असे. छोट्या मिशेलचा हा प्रश्न क्लॉरेन्स यांनी कधी गांभीर्याने घेतला नाही. १२ वर्षांची झाली तेव्हाच मिशेलने लष्करात दाखल होण्याचा दृढनिश्चय केला.
मात्र, महिलांना लष्करात भरती होण्यास बंदी घालणारा कायदा तिच्या जिद्दीला अडसर ठरला. मिशेल निराश झाली. तिच्या आईने "काळ बदलेल, वाट पाहा' अशी आशा तिच्यात जागवली. दिवस खरेच पालटले. चार वर्षांनंतर कायदा बदलला. ५ फुटांच्या मिशेलला १७ व्या वर्षी १९७८ मध्ये अ‍ॅनापोलिसच्या नौदल अकादमीत प्रवेश मिळाला.
अ‍ॅडमिरल मिशेल हॉवर्ड : अमेरिकी नौदलाच्या उपप्रमुख
>जन्म : 3० एप्रिल १९६०
>शिक्षण : 1९८२ मध्ये यूएस नेव्हल अकादमीतून पदवी
> कुटुंब : पती वायेन काओलेस, माजी नौदल कर्मचारी, मुले नाहीत.
चर्चेत कशामुळे? : अमेरिकी नौदलाच्या २३८ वर्षांच्या इतिहासात फोर स्टार अ‍ॅडमिरल रँक मिळवणारी पहिली आफ्रिकी-अमेरिकी महिला.
मिशेलच्या नौदल कारकीर्दीत तिला सर्वात मोठे आव्हान २००९ मध्ये स्वीकारावे लागले होते. अरबी समुद्रात सोमालियन लुटारूंनी उच्छाद मांडला होता. त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी नेमलेल्या पथकाच्या प्रमुखपदी मिशेल यांची नेमणूक झाली. हा पदभार स्वीकारून तिला तीनच दिवस झाले होते. लुटारूंनी "मेअरसेक अल्बामा' या अमेरिकी मालवाहू जहाजावर दूर समुद्रात ताबा मिळवला. कॅप्टन फिलिपला ओलीस ठेवले. कॅप्टनची लवकरात लवकर सुटका करण्याचे आदेश मिशेलला मिळाले. त्या वेळ मिशेलचे युद्धक जहाज "यूएएस बेनब्रिज' अपहृत जहाजापासून ३०० मैलांवर होते. मिशेल घटनास्थळाजवळ पोहोचली तेव्हा साेमालियन लुटारू कॅप्टनला लाइफ बोटमधून समुद्रकिनारी घेऊन जात होते. या लुटारूंना सोमालियाच्या किना-यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही, असा निश्चय मिशेलने केला. कारण, एकदा ते आपल्या देशात पोहोचले की कॅप्टन फिलिपचा शोध घेणे कठीण जाईल, अशी तिची धारणा होती.
अवघ्या ११ तासांत हे लुटारू किना-यावर पोहोचणार होते. कॅप्टनच्या हत्येची ते धमकी देत होते. तडजोडीची शक्यता नव्हतीच. कॅप्टनला मारहाण सुरू झाली तेव्हा मिशेलने डाव टाकला. कमांडोंना लुटारूंच्या तावडीतून सहीसलामत सोडवून आणण्याचे आदेश तिने दिले. काही मिनिटांत कमांडोंनी ही कामगिरी फत्ते केली. कॅप्टन फिलिप सहीसलामत सुटले. मिशेलचे नियोजन आणि या धाडसावर काढण्यात आलेला "कॅप्टन फिलिप' हा चित्रपटही नंतर खूप गाजला.