आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्राइव्ह इन चित्रपटगृहांमध्ये प्रदीर्घ मध्यंतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्ट महिन्याच्या एका रात्री मॅसाच्युसेट्सच्या वेलफ्लीट शहरात वेलफ्लीट ड्राइव्ह इन थिएटरचे वातावरण बघता असे वाटणार नाही की, अशा सिनेमागृहांचे अस्तित्व धोक्यात आहे. तिथे कार उभी करण्यासाठी मोकळी जागा धुंडाळावी लागते. पॉपकॉर्न खाणारी मुले आणि त्यांचे आई-वडील चित्रपट सुरू होण्याची वाट पाहत आहेत. खरे म्हणजे ड्राइव्ह चित्रपटगृहे इतिहासाच्या महत्त्वाच्या वळणावर आहेत. मालमत्तेच्या किमती आणि शॉपिंग मॉल्समधील मल्टिप्लेक्सनी त्यांच्या मार्गात मोठा धोंड टाकला आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याच्या चर्चेदरम्यान चित्रपट पाहण्याची ही पद्धत तंत्रज्ञान आणि आर्थिक समस्यांनी ग्रासला आहे.

रिचर्च एम. होलिंगशीड यांनी 80 वर्षांपूर्वी ड्राइव्ह इन चित्रपटगृहांचे पेटंट नोंदवले आणि न्यू जर्सीमध्ये अशा प्रकारचे पहिले चित्रपटगृह उभारले. कारवेल्हाळ असलेल्या अमेरिकेच्या संस्कृतीवर ड्राइव्ह इनने कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे. ग्रीझ आणि द आउटसायडर यांसारख्या चित्रपटांत या संस्कृतीला सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. युनायटेड ड्राइव्ह इन चित्रपटगृह मालक संघटनेचे अध्यक्ष जॉन विन्सेंट मानतात की, ड्राइव्ह इन दुस-या यशस्वी फेरीसाठी तयार आहे. आम्ही कमाई करत राहिलो नसतो तर, काम कसे चालले असते? ते हेदेखील स्वीकारतात की, त्यांच्या व्यवसायासमोर कित्येक आव्हाने आहेत. 1958 मध्ये ज्यावेळई हा उद्योग शिखरावर होता, त्या वेळी अमेरिकेत 4063 ड्राइव्ह चित्रपटगृहे होती. 1990 मध्ये ही चित्रपटगृहे बंद होऊ लागली आहेत. गेल्या दशकात मोठ्या संख्येने ड्राइव्ह इन चित्रपटगृहे बंद झाली. आता फक्त 357 उरले आहेत.

चित्रपटांना प्रिंटऐवजी डिजिटल प्रोजेक्टरवर दाखवणारे महागडे तंत्रज्ञान महागात पडू शकते. वलकरच चित्रपटांच्या प्रिंट निघणे संपुष्टात येईल. एखादे चित्रपटगृह डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणार नसल्यास त्याला आपला गाशा गुंडाळावा लागेल. 40 टक्के ड्राइव्ह इन चित्रपटगृहांचे रूपांतर डिजिटलमध्ये झाले आहे. डिजिटल सिनेमा कंपनी सिनेडाइम आणि चित्रपटगृह मालक संघटनेने ड्राइव्ह इनच्या मदतीसाठी योजना तयार केली आहे. प्रिंट न बनवणारे फिल्म स्टुडिओ डिजिटल प्रोजेक्टरसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी ड्राइव्ह इनला मदत करतील. एका स्क्रिनसाठई डिजिटल प्रोजेक्टरसाठी 70 हजार डॉलर खर्च येतो. प्रत्येक ड्राइव्ह इनसाठी डिजिटल अवलंबणे सोपे नसते. लहान चित्रपटगृहांना हे अवघड असेल. विन्सेंट सांगतात, 40 टक्के इतर ड्राइव्ह इन डिजिटल होण्याच्या प्रयत्नात आहेत. ड्राइव्ह इनला कर्ज देताना बँका नाखुश असतात. मात्र, एखाद्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनची मोजदाद होताना ड्राइव्ह इनची गणती पहिल्या दहा चित्रपटगृहांत होते.

प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ड्राइव्ह इन विविध क्लृप्त्या अवलंबतात. क्राउड फंडिंगद्वारे निधी गोळा करतात. यंदा फोर्ट वर्थ, टेक्सासमध्ये खुले कोयोटोने ड्राइव्ह इनने जुने वेभव साकारण्याचा प्रयत्न केला आहे. बियर, वाइनसह काही मेन्यू ठेवले जातात. प्रायव्हेट-पब्लिक भागीदारीच्या चित्रपटगृहांत आठवड्याला 10 हजार तिकीट विक्री होते. ड्राइव्ह इनमध्ये सिनेमा पाहण्याची मजा काही औरच असते. तुम्ही कारच्या टपावर लोळता लोळता चांदण्या न्याहाळत चित्रपट पाहू शकता.