आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Ebola Virus By Dr.Jagannath Dixit, Divya Marathi

इबोलाविषयी थोडेसे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप तसेच फेसबुक यावरील ‘कट अँड पेस्ट’ पोस्टमधून इबोला या रोगाविषयी लोकांना भीती वाटेल, अशी माहिती पसवण्यात येत आहे. अनेकदा अशा पोस्ट ‘मानवतावादी’ दृष्टिकोनातून, त्याच्या खरेखोटेपणाची शहानिशा न करता शेअर केल्या जातात. साहजिकच समाजात भयाची बीजे रोवली जातात. त्यामुळे या विषाणूविषयी व होणा-या इबोला विषाणू रोगाविषयी शास्त्रीय माहिती या लेखात देत आहोत.

इबोला हा फ्लॅव्हीव्हायरेडी या कुलातील विषाणू असून त्याचे पाच मुख्य उपप्रकार आहेत. इबोला विषाणू रोगाचे पहिल्यांदा निदान 1976 मध्ये झाले. त्यावेळी सुदानमधील एनझारा व कॉन्गो प्रजासत्ताकातील याम्बुकु येथे या रोगाच्या दोन साथी आल्या. काँगो येथील साथ इबोला नदीच्या काठी वसलेल्या खेड्यात आली. म्हणून या रोगाला इबोला विषाणू रोग हे नाव पडले. इबोला विषाणू रोगाच्या साथी सामान्यपणे मध्य व पश्चिम आफ्रिकेतील वर्षावनांच्या जवळ असणा-या दुर्गम खेड्यांमध्ये येतात. हा रोग मुख्यत्वे चिपांझी, गोरीला व डुकरे यांचा असून अपघाताने माणसांत रोगाचा संसर्ग होतो. प्राण्यापासून हा रोग माणसाला होतो. टेरोपोडिड या जातीच्या वटवाघळामध्ये हा विषाणू निसर्गत: आढळून येतो.

इबोला विषाणू रोग झालेल्या प्राण्याचे रक्त मांस वा इतर स्त्राव यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्याने माणसाला हा रोग होतो. हानीग्रस्त किंवा फाटलेल्या त्वचा किंवा श्लेष्मल आवरणातून विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर याच पद्धतीने इबोला विषाणू रोग झालेल्या रुग्णापासून इतरांना रोगाचा प्रसार होऊ शकतो.

पुढे वाचा इबोलाची लक्षणांविषयी...
इबोला रोगाची लक्षणे
रोगात अचानक ताप येणे, प्रचंड थकवा येणे, स्नायू दुखणे तसेच घसा सुजणे ही लक्षणे दिसून येतात. नंतर रुग्णाला उलट्या व जुलाब होतात. अंगावर पुरळ येते. मुत्रपिंड व यकृताचे कार्य बिघडते. काही रुग्णांमध्ये अंतर्गत किंवा बर्लिगत रक्तस्त्राव होतो. या रोगामध्ये रुग्ण मरण्याचे प्रमाण 90 टक्के इतके जास्त आहे. प्रयोग शालेय तपासण्यांमध्ये रक्तातील पांढ-या पेशी व प्लेटलेट्स कमी झाल्याचे आढळते व यकृताशी संबंधित विकाराचे प्रमाण वाढते. एलायझा तपासणी किंवा विषाणूची कृत्रिमरित्या वाढ करून रोगाचे खात्रीशीर निदान करता येते. रोगाचा अधिशयन कालावधी दोन ते एकवीस दिवस आहे. या काळात रुग्ण रोगप्रसार करू शकत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर सुमारे दोन महिने रुग्ण त्याचे रक्त वा इतर स्रावाद्वारे रोगप्रसार करू शकतो.

मर्यादित उपचार
या रोगासाठी प्रतिबंधक लस नाही व विशिष्ट असे उपचारही नाहीत. आपत्कालीन उपचार द्यावे लागतात. त्यामुळे साहजिकच रोग होऊ न देणे खूप महत्त्वाचे आहे. ते आपल्याला सहज शक्य आहे. एक तर हा रोग गिनी, लायबेरिया, सिएरा, लिओन व नायजेरिया या चार देशांपुरताच सध्या तरी मर्यादित आहे. डुक्कर, चिंपांझी, गोरीला जंगली प्राण्यांचे कच्च्े मास/ रक्त यांचे सेवन टाळणे. त्यांना न हाताळणे हे रोग टाळण्याचे प्रभावी उपचार आहेत. रोगग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यास हातात संरक्षक मोजे घालणे, संरक्षक कपडे वापरणे आणि रुग्णापासून दूर गेल्यावर हात साबण व पाण्याने स्वच्छ धुणे, हे उपाय अतिशय प्रभावी ठरतात. एकूण तुमच्या लक्षात येईल की इबोलाचा फार बोलबाला करायची गरज नाही. कारण नाही तर सर्दी, पडशाच्या तापालाही तुम्ही इबोला ताप समजाल व त्रस्त व्हाल.