आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Artificial Intelligence: No Longer The Stuff Of Science Fiction

कृत्रिम बुद्धिमत्तेपासून धोका आहे की काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी अलीकडे इशारा दिला आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआई) मानव बुद्धिमत्तेला वरचढ होऊ लागल्यास ती संस्कृतीला धोका निर्माण करू शकते. डिजिटल मनी, खासगी अंतराळ उड्डाणे आणि इलेक्ट्रिक कारांच्या क्षेत्रांत ओळख निर्माण करणार्‍या इलोन मस्क यांनीही अशी भीती व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) नवोदित तंत्रज्ञान सुरक्षित ठेवण्याची रणनीती आखण्यावर विचार झाला पाहिजे. जैवतंत्रज्ञान एआयपेक्षा दोन दशके जुने आहे. १९७५ मध्ये एसिलोमर कॉन्फरन्समध्ये डीएनएवरील शोधामुळे उद‌्भवलेला धोका टाळण्यासाठी गाइडलाइन ठरवली होती. वेळोवेळी गाइडलाइन्समध्ये दुरुस्ती केली. दरम्यान वैद्यकशास्त्र बरेच पुढे गेले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेन्ससाठी गाइडलाइन बनवण्यावर गेल्या ६०-७० वर्षांपासून विचार होत आहे. ईसाक असिमोव यांनी १९४२ मध्ये आपली छोटी कहाणी-रन अराउंडमध्ये रोबोटिक्सवर तीन नियम लिहिले होते. त्याच्या आठ वर्षांनंतर १९५० म्धेय एलन ट्यूरिंग यांनी आपली शोधपत्र कॉम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजेन्समध्ये एआयचा उल्लेख केला होता. एआयवर काम करणार्‍यांचा विचार आहे की, मानवासारखा एआय स्तर प्राप्त करण्यात अजून पुष्कळ लांब आहोत. यात विद्यापीठे, कंपन्यांमध्ये एआयपासून सुरक्षेची गाइडलाइन बनवण्यात काम सुरू आहे. प्रत्येक एआय प्रोग्राम मिशनला परिभाषित करण्याची,सुरक्षित ठेवण्याचा आयडिया पुढे आली आहे. सध्या रोगपरीक्षण, एनर्जी विकास, पर्यावरण संरक्षण, या क्षेत्रांत एआयचा उपयोग होत आहे. मानवतेसमोर उपस्थित आव्हानांना तोंड देण्यात एआय महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान सिद्ध होईल.
(कुर्जवील यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर ५ पुस्तके लिहिली आहेत.)