आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashes Series: Kangaroo\'s Rozers, Watson, Beli Made Half Century

अ‍ॅशेस मालिका: कांगारूंकडून रॉजर्स, वॉटसन, बेलीची अर्धशतके !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅडिलेड - रिटर्न अ‍ॅशेस मालिकेतील दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वर्चस्व राखले. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकली. सलामीवीर क्रिस रॉजर्स (72), शेन वॉटसन (51) आणि जॉर्ज बेली (53) यांच्या अर्धशतकाच्या बळावर कांगारूंनी दिवसअखेर 5 बाद 273 धावा काढल्या.
ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट शिल्लक असून दिवसाचा खेळ संपला त्या वेळी कर्णधार मायकेल क्लार्क 48 आणि यष्टिरक्षक ब्रेड हॅडिन 7 धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने 63 धावांत 2 गडी बाद केले. जेम्स अँडरसन, ग्रीम स्वान आणि माँटी पानेसर यांनी प्रत्येकी एकाला बाद केले. इंग्लंडने या लढतीत दोन फिरकीपटूंना खेळवले.
रॉजर्सची झुंज
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर क्रिस रॉजर्सने वॉर्नरसोबत 34 धावांची सलामी दिली. यानंतर शेन वॉटसनसोबत त्याने दुस-या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. रॉजर्सने 167 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार मारले. फिरकीपटू स्वानच्या गोलंदाजीवर प्रायरने त्याचा झेल घेतला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रलिया पहिला डाव : 5 बाद 273. (क्रिस रॉजर्स 72, शेन वॉटसन 51, जॉर्ज बेली 53, क्लार्क नाबाद 48).