आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या हेरगिरीमुळे आशियाई देश संकटात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॅँकॉक - चीनमधील सायबर हेरगिरीनंतर अमेरिकेकडून केल्या जाणा-या सर्वात मोठ्या सायबर हेरगिरीचा मुद्दा गाजत आहे. गुगल, याहूसारख्या वेबसाइट्सद्वारे अनेक देशांत काम चालते. त्यामुळे आशियाच्या अनेक देशांतील सरकारांवर यामुळे संकट ओढवले आहे. अमेरिकेची राष्‍ट्रीय सुरक्षा संस्था, एनएसए प्रिझ्म कार्यक्रमाअंतर्गत या साइट्सवर हेरगिरी करत आहेत. इंडोनेशियाच्या बहुतांश सरकारी संदेशांची देवाण-घेवाण जी-मेल, याहू तसेच गुगलमार्फत होते. यावर संवेदनशील माहिती असते. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांचे ई-मेल अ‍ॅड्रेस या साइट्सवरच आहेत. बॅँकॉकमध्ये संयुक्त राष्‍ट्र आर्थिक व सामाजिक आयोगाच्या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. यातील आशियाच्या 33 पैकी 20 देशांतील अधिका-यांनी संपर्क अर्जामध्ये आपले वेब अ‍ॅड्रेस जी-मेल, हॉटमेल किंवा याहू नमूद केले आहेत. थायलंडच्या 18 पैकी केवळ सहा अधिका-यांनी ई-मेलचा वापर केला आहे.


भारताचा इशारा
गुगलचाही विरोध

हेरगिरीमध्ये भारतीय कायद्याचे उल्लंघन झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, असे भारताने मंगळवारी स्पष्ट
शब्दात सुनावले होते. दुसरीकडे गुगलने ओबामा प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, आम्ही 15 वर्षांत युजर्सचा विश्वास मिळवला आहे. युजर्सची माहिती घेण्याच्या सरकारी प्रयत्नांमुळे आमची पिछाडी होत आहे. मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ट्विटरनेही गुगलला पाठिंबा दिला आहे.


बंद करा निगराणी
हेरगिरी संस्थांकडून व्यापक प्रमाणात निगराणी ठेवली जात असल्यामुळे संशय निर्माण झाला आहे. हेरगिरी तत्काळ बंद व्हावी. संसद सदस्यांना हेरगिरी कार्यक्रमाची नियमित माहिती दिली जाते, असे अधिका-यांनी सांगितले. संसद सदस्यांनी या कार्यक्रमाला दोन वेळा मंजुरी दिली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे प्रकरण समोर आल्यानंतर संसद सदस्यही चकित झाले आहेत.
ओबामांचे उत्तर - तुम्हाला 100 टक्के सुरक्षा हवी असेल तर 100 टक्के प्रायव्हसी ठेवू शकत नाही. काहीतरी किंमत मोजावी लागेल.


ओबामांनी आपले धोरण पारदर्शक करावे
राष्‍ट्रीय सुरक्षा माहिती धोरण पारदर्शक करावे, अशी मागणी गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ट्विटर या कंपन्यांनी अमेरिकी राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे केली आहे. गुगलने सर्वात पहिल्यांदा ही मागणी केली. यानंतर तत्काळ मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ट्विटरने हे पाऊल उचलले. दरम्यान, अमेरिकेच्या हेरगिरीचा भंडाफोड करणारा एडवर्ड स्नोडेन आपल्या प्रेयसीसह हाँगकाँगमधून अद्यापही गायब आहे. आमच्याकडे स्नोडनसंबंधी कोणतीच माहिती नाही, असे हॉँगकॉँगच्या इमिग्रेशन अधिका-यांनी म्हटले आहे.