आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एशियन गेम्स ओपनिंग सेरेमनीमध्ये, तिरंगा घेऊन सरदार सिंगने केले भारताचे नेतृत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - 17 व्या आशियाई खेळांच्या शुभारंभाचा सोहळा सुरू झाला असून, खेळाडुंची परेड झाली आहे. भारतीय पथकाने मैदानात प्रवेश केला तेव्हा हॉकी कर्णधार सरदार सिंहने पथकाचे नेतृत्व केले. त्याच्या हाती तिरंगा होता. भारतीय पथकात 516 खेळाडुंसह 679 सदस्य आहेत.

साऊथ कोरियाच्या राष्ट्रगीताने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर साऊथ कोरियाच्या कलाकारांनी त्यांचा इतिहास सर्वांसमोर मांडला. साऊथ कोरियाचे प्रेसिडेंट पार्क गुएन-हेय मध्ये येथील प्रसिद्ध गायिका सुमी जो हिने सादरीकरण केले.
60,000 हून अधिक प्रेक्षक, 45 देशांमधून आलेले 13,000 खेळाडू आणि इतर अधिकारी इंचियोन एशियाड स्टेडियममध्ये पोहोचले आहेत.
साधारणपणे अशा सोहळ्यांमध्ये आपल्या देशांची शक्ती किंवा गुणगान दाखवले जाते. पण याला फाटा देत साऊथ कोरियाने आशियाई देशांची एकता या थीमवर कार्यक्रमांचे सादरी करण केले. त्यावर आधारीत काही गोष्टी नाटक रुपात सादर करण्यात आल्या.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोहळ्याची LIVE छायाचित्रे...