आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्‍कादायकः अपघातग्रस्‍त आशियाना एअरलाईन्‍सचा वैमानिक होता प्रशिक्षणावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रॅन्सिस्‍को विमानतळावर कोरियाच आशियाना एअरलाईन्‍सचे विमान अपघातग्रस्‍त झाले. या अपघातात 2 जणांचा मृत्‍यू झाला. तर 305 जण आश्‍चर्यकारकरित्‍या बचावले. या घटनेच्‍या प्राथमिक तपासात काही खळबळजनक माहिती पुढे आली आहे. विमानाचा वैमानिक प्रशिक्षणावर होत आणि बोईंग 777 विमानाचे त्‍याने प्रथमच उड्डाण केले होते.

अमेरिकेच्‍या 'नॅशनल ट्रान्‍सपोर्ट सेफ्टी बोर्ड'तर्फे अपघातग्रस्‍त विमानाच्‍या आतील काही छायाचित्रे जारी केली आहेत. तपास अधिका-यांनी सांगितले की, उतरताना ठराविक गतीपेक्षा विमानाचा वेग कमी होता. सुमारे ताशी 254 किलामीटर वेग होता. कॉकपीट व्‍हॉईस रेकॉर्डरमध्‍ये ही माहिती नोंदविण्‍यात आली आहे. अशा स्थितीत विमान उतरविणे धोक्‍याचे होते. वैमानिकाने तसा प्रयत्‍नही केला. परंतु, त्‍याला यश मिळाले नाही.