आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी गॅसमुळे असिफ अली झरदारी आजारी; कार्यक्रम रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी पूर्वेकडील भागाच्या दौर्‍यावर आहेत; परंतु त्यांनी आपले नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून विश्रांती घेणे पसंत केले आहे. त्यासाठी आजारपणाचे कारण पुढे केले आहे. वादग्रस्त इराण गॅस प्रकल्पाने त्यांची डोकेदुखी वाढल्याचे सांगितले जाते.

शुक्रवारी झरदारी यांनी दिवसभर आराम केला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपले कार्यक्रम रद्द केले. झरदारी यांना अस्वस्थ वाटत आहे; परंतु चिंतेचे काही कारण नाही, असे प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले. पाकिस्तान-इराण यांच्यातील वादग्रस्त गॅस पाइपलाइनमुळे झरदारी चांगलेच ताणाखाली आहेत. त्यामुळेच त्यांना ही विर्शांती घ्यावी लागल्याचे पीपीपीच्या एका नेत्याने सांगितले. हा प्रकल्प 7.5 अब्ज डॉलर्सचा आहे. पाकिस्तानातील प्रॉपर्टी टायकून मलिक रियाझ हुसैन याने भेट दिलेल्या शाही निवासस्थानात ते विर्शांती घेत आहेत. शुक्रवारी रात्री पंतप्रधान राजा परवेझ अशरफ, काश्मीर व्यवहार मंत्री मन्झूर व्ॉट्टू यांनी बंगल्यावर हजेरी लावली.