आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएसआयकडून माझ्या हत्येचा कट -अस्मा जहॉंगीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- नागरी हक्क कार्यकर्त्या अस्मा जहाँगीर यांनी आपली हत्या होण्याची भीती व्यक्त केली आहे. पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा व आयएसआयकडून आपल्यावर जीवघेणा हल्ल्याचा कट करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
अस्मा जहाँगीर व्यवसायाने वकील आहेत. त्याचबरोबर देशात लोकशाही स्थापन व्हावी यासाठी प्रदीर्घ काळापासून संघर्ष करत आहेत. अस्मा यांनी सोमवारी अनेक टीव्ही वाहिन्यांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी गुप्त माहीतगाराने या कटाची माहिती दिली. अशा प्रकारच्या कथित हल्ल्याची तयारी उच्च स्तरावर केली जात आहे.
या माहितीनंतर अस्मा यांच्या हालचाली काहीशा मंदावल्या. त्यांनी जास्तीत जास्त वेळ घरातच राहण्याचे ठरवले. दुसरीकडे मानवी हक्क आयोगाने सरकारला इशारा दिला आहे. एका कार्यक्रमासाठी हॉटेल बुक करण्यासाठी त्यांना काही दिवसांपूर्वी मनाई करण्यात आली होती. त्यामागे आयएसआयचा हात होता. अस्मा यांच्या वक्तव्यानंतर मानवी हक्क आयोगाने त्यांचे वक्तव्य सहज घेऊ नका. त्यांना असलेला धोका लक्षात घेऊन त्यांना पूर्ण सुरक्षा प्रदान करण्यात यावी, असे आयोगाने म्हटले आहे.