आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Assad's Forces Pound Rebel Stronghold In Aleppo ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलेप्पोवर सिरियन लष्कराचा ताबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलेप्पो - सिरियात बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या अलेप्पो शहरावर रविवारी सिरिया सैन्याने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
दुसरीकडे दमास्कसमध्ये अडकलेल्या 48 नागरिकांची सुटका करण्यात यावी, असे आवाहन इराण सरकारकडून करण्यात आले. दमास्कस येथे एका बसमध्ये 48 नागरिक आहेत, असे वृत्त अरेबिक न्यूज चॅनेलने दिले आहे. या नागरिकांना बंडखोरांनी ओलिस ठेवल्याचे वृत्त वाहिनीच्या फुटेजमध्ये दाखवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अलेप्पो परिसरात लष्कर व बंडखोर यांच्यात धुमश्चक्री सुरू होती. रविवारी अखेर लष्कराने बंडखोरांचा पाडाव करून अलेप्पोवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यात यश मिळवले, असे लष्करातील उच्च पदस्थ सुरक्षा सूत्राकडून सांगण्यात आले. त्या अगोदर रविवारी सकाळी दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबारात दोन बंडखोर ठार झाले. 20 जुलैपासून येथे तुंबळ युद्ध सुरू होते. परंतु या हिंसाचाराला लष्करच जबाबदार असल्याचा आरोप सिरियन नॅशनल कौन्सिलने केला आहे.