Home »International »Other Country» Astronomy: Galactic Radiation Records Star Creation

अंतराळात ऊर्जेचे विशाल स्रोत सापडले

वृत्तसंस्था | Jan 07, 2013, 02:59 AM IST

  • अंतराळात ऊर्जेचे विशाल स्रोत सापडले

मेलबर्न - अंतराळात ऊर्जेचे विशाल स्रोत सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ऊर्जेचे हे स्रोत पृथ्वीवरूनही दिसतात, असे त्यांचे म्हणणे आहे. ही ऊर्जा 1000 किलोमीटर प्रतिसेकंद या गतीने आकाशगंगेच्या मधून बाहेर पडते व वरपासून खालपर्यंत ती 50 हजार प्रकाशवर्षांपर्यंत पसरली आहे. हे क्षेत्र आपल्या आकाशगंगेच्या व्यासाच्या निम्मे आहे. न्यू साऊथ वेल्स येथे एका दुर्बिणीच्या साहाय्याने या प्रक्रियेचे अवलोकन करत असलेल्या शास्त्रज्ञांच्या पथकाने याबाबत माहिती दिली आहे. एबीसीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अंतरिक्ष ऊर्जा नव्याने तयार ता-यापासून बाहेर पडत आहे.

आतापर्यंत असे समजले जात होते की, आकाशगंगेच्या मध्यावर असलेल्या ब्लॅकहोलमधून ही ऊर्जा बाहेर पडते. या ‘स्पेस गीझर्स’चा शोध घेणा-या पथकात न्यू साऊथ वेल्स, अमेरिका, इटली, नेदरलँड देशांच्या शास्त्राज्ञांचा समावेश आहे. त्यांच्या शोधाची माहिती नेचर्स नियतकालिकात प्रकाशित झाली आहे.

* ‘प्रवाहात उपलब्ध असलेली ऊर्जा ता-यांच्या स्फोटातून निघाणा-या ऊर्जेपेक्षा लाखपट जास्त आहे. ती आपल्याकडे येत नाही. गॅलेक्टिक प्लेनमधून निघाल्यानंतर तिच्या दिशेत अनेक बदल होतात. त्या मुळे त्या ऊर्जेपासून आपल्याला काहीच धोका नाही कारण गॅलेक्टिक सेंटरपासून आपली पृथ्वी 30 हजार प्रकाशवर्षे दूर आहे.’’ -एत्तोरे कॅरेटी, संशोधक पथकाचे प्रमुख.

Next Article

Recommended