आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At Least 19 Killed In Rebel Fire On Syria's Aleppo

अलेप्पोमध्ये जाळपोळ, १९ जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरट - सिरियातील सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या उत्तरेकडील अलेप्पो शहरात शुक्रवारी बंडखोरांनी जाळपोळ केली. अनेक सरकारी इमारतींना पेटवून देण्यात आले. त्यात किमान १९ जणांचा मृत्यू झाला.

बंडखोरांनी सरकारी इमारतीवर रॉकेट डागले. मृतांत पाच मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. गुरूवारी रात्रीपासून हिंसाचार सुरू असून त्यात ३२ जण जखमी झाल्याचा दावा ब्रिटनच्या देखरेख संस्थेकडून करण्यात आला आहे. सिरियाचे आर्थिक राजधानी म्हणून अलेप्पो शहराची आेळख आहे. परंतु २०१२ पासून शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. शहरावर बंडखोरांनी ताबा मिळवण्याचे वारंवार प्रयत्न केले. परंतु सरकारी फौजांनी त्यांचे मनसुबे हाणून पाडले होते.

गुरूवारी रात्रीपासून मात्र बंडखोर अधिक सक्रीय झाले असून त्यांनी शहरावर जोरदार चढाई केली. दरम्यान, सिरियातील बंडामुळे आतापर्यंत २ लाखाहून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. २०११ पासून हा हिंसाचार सुरू आहे.

पूर्व प्रांत बंडखोरांच्या ताब्यात
आतापर्यंत संपूर्ण शहर ताब्यात घेण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात यश आलेले असले तरी उत्तरेकडील भाग सरकारकडे आहे. पूर्वेवर मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून बंडखोरांचे राज्य आहे. ते मिळवण्यात मात्र सरकारी फौजा अद्यापही यशस्वी झालेल्या नाहीत.