आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At Least 3 Killed As Gas Explosion Hits East Harlem New York City

अमेरिकेमध्ये स्फोट, इमारत कोसळून 2 ठार, 17 जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनच्या पूर्वेकडील हर्लेम भागात बुधवारी सकाळी एका निवासी इमारतीत भीषण स्फोट झाला आणि नंतर प्रचंड आगीचे लोट उठले. या स्फोटामुळे दोन इमारती कोसळल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेत 2 जण ठार, तर 17 जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, तथापि, अनेक लोक ढिगार्‍याखाली दबले असण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30च्या सुमारास ही दुर्घटना झाली. त्यानंतर मेट्रोची उत्तरेकडील रेल्वेसेवा बंद करण्यात आली. रेल्वे रूळापर्यंत मातीचे ढिगारे पडल्यामुळे मेट्रो बंद करण्यात आली. निवासी इमारतीतच ही आग लागली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे. या ठिकाणचे बहुतांश रहिवासी कामावर गेले होते. हेलिकॉप्टरच्या साहय़ाने इमारतीच्या वरील बाजूची छायाचित्रे दाखवण्यात आली.
त्यात छत उद्ध्वस्त दिसते.

पुढील स्लाइडमध्ये, आणखी छायाचित्र..