आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शादी मुबारक : आतिफ- सारा विवाह बंधनात...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आतिफ अस्लम याने आपली मैत्रिण सारा भारवाना हिच्यासोबत विवाह केला आहे. आतिफ आणि सारा गेल्या 7 वर्षापासून एकमेंकाच्या संपर्कात होते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे वृत्त आतिफच्या फेसबुक पेजवर छायाचित्रांसह देण्यात आले आहे.


26 मार्च ( मंगळवारी) रोजी मेहंदीचा कार्यक्रम झाला तर, 28 मार्च (गुरुवारी) रोजी निकाह समारंभ पार पडला. शुक्रवारी (29 मार्च) लाहोरमधील रॉयल पाल्म क्‍लब येथे दावत-ए-वालिमा (रिसेप्शन) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आतिफने हिंदी चित्रपटात अनेक गाणी गायली असून, त्याने आपल्या आवाजाने अनेक युवकांचे मन जिंकले आहे. याचबरोबर कलर व सहारा या संयुक्त वाहिनीने आयोजित केलेल्या 'सूरक्षेत्र' या संगीत रियॉलिटी शो मध्ये आतिफने पाकिस्तानच्या कॅप्टनची भूमिका पार पाडली होती. हा शो राज ठाकरे व आशा भोसले यांच्यामुळे चर्चेत आला होता.