आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानैरोबी - केनियाची राजधानी नैरोबीतील वेस्टगेट मॉलमध्ये दहशतवाद्यांनी अमानुषपणाचा कळस गाठला. लोकांना रांगेत उभे करून या क्रूरकर्म्यांनी त्यांचा धर्म विचारला. एका भारतीयाने मुस्लिम असल्याचे उत्तर दिले. अतिरेक्यांनी इस्लामबाबत प्रश्न विचारला. भारतीय समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तेव्हा त्याला गोळी घालण्यात आली.
अतिरेक्यांच्या तावडीतून सुटलेल्या हकिमाने ही माहिती दिली. गर्भवती महिलेलाही या अतिरेक्यांनी सोडले नाही. तत्पूर्वी, सोमवारी तिस-या दिवशीही मॉलमध्ये चकमक सुरूच होती. मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यासारखाच हा हल्ला आहे. दरम्यान, या हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू झाला असून भारतीयाचा आकडा 8 झाला आहे.
दहशतवाद्यांचा आकडा दोन्ही ठिकाणी दहाच होता आणि घातपातही तीन दिवस सुरू होता.
दरम्यान, दोन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून स्वत:ला उडवून दिल्याचे लष्कराने सांगितले. उरलेल्या अतिरेक्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आणण्यात लष्कराला यश आले असून, सर्व ओलिसांना सोडवण्यात आले आहे, असा दावा केनियाचे राष्ट्रपती उहरू केन्याटा यांनी केला आहे. तत्पूर्वी, मॉलभोवतीचा लष्कराचा घेराव हटवला नाही तर सर्व ओलिसांना ठार करू, अशी धमकी अतिरेक्यांनी दिली होती.
नैरोबीच्या मॉलवरील हल्ला मुंबईसारखाच
गर्भवतीचीही हत्या
दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांना कुराणातील आयत ऐकवण्यास सांगितले. केनियातील पोस्टवाला म्हणाले, दहशतवाद्यांनी पळणा-यांवर गोळ्या चालवल्या. 8 महिन्यांची गर्भवती रोहिला राडिया ठार झाली. मॉलमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या तीन मुलींची त्यांच्या आईसह हत्या करण्यात आली.
राष्ट्रपतींचा भाचाही ठार
राष्ट्रपती केन्याटा यांचा भाचा आणि एक मित्रही गोळीबारात मारला गेला. हल्ल्याच्या वेळी मॉलमध्ये भारत, अमेरिका, घाना, फ्रान्स आणि ब्रिटनसह 13 देशांचे जवळपास एक हजार लोक होते. नैरोबीतील हा मॉल लोकप्रिय मानला जातो.
पाच अतिरेकी अमेरिकी
अतिरेकी अल-कायदाशी संबंधित सोमालियातील अल-शबाब गटाचे होते. त्यातील पाच जण अमेरिकी, दोघे ब्रिटिश होते, असे केनियाचे लष्करप्रमुख जनरल ज्युलियस करांगी म्हणाले. अल-शबाबचा प्रवक्ता शेख अली मोहंमदने पुन्हा वेबसाइटवर धमकी दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.