आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाहोर - अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आलेल्या गोळीबारात नऊ पोलिस ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानमध्ये आज गुरूवारी अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आलेल्या गोळीबारात नऊ पोलिस ठार झाले.
पाकिस्तानत मागील चार दिवसांपासून पोलिसांवर करण्यात आलेला हा दुसरा हल्ला आहे.
ठार झालेले सर्व पोलिस पंजाब कारागृह अकादमीतील असून, ते प्रशिक्षण घेत होते. या हल्यामध्ये तीन पोलिसही जखमी झाले आहेत.
यापूर्वी, सोमवारी लाहोर नजदीक करण्यात आलेल्या हल्यात सहा जवान आणि एका पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. या करण्यात आलेल्या दोन्ही हल्यांची जवाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.