आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅपलच्या डेव्हलपर वेबसाइटवर हल्ला, गोपनीय माहितीची चोरी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अ‍ॅपलच्या डेव्हलपर वेबसाइटवर मागच्या गुरुवारी सायबर हल्ला झाला. अ‍ॅपलचे स्मार्टफोन आणि टॅब्लेट प्लॅटफार्म आयओएस 7 ची थर्डपार्टी डेव्हलपरकडून चाचणी घेतली जात असतानाच हा हल्ला करण्यात आला.


अ‍ॅपलच्या डेव्हलपर साइटवर आर्थिक माहितीही आहे. ती माहिती चोरीला गेली असण्याची शक्यता आहे. कोणत्याही ग्राहकाच्या माहितीशी तडजोड केली जाणार नाही, असे अ‍ॅपलने म्हटले आहे. मात्र, काही डेव्हलपर्सची नावे, ई-मेल आयडी आणि पत्रव्यवहाराची माहिती सायबर हल्लेखोरांनी चोरली असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. ज्या वेबसाइटवर हल्ला करण्यात आला ती ग्राहकांच्या माहितीशी संबंधित नव्हती, असे अ‍ॅपलच्या प्रवक्त्याने सांगितले. सायबर हल्ला करणारे नेमके कोण होते, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या ओळखीबाबत काहीही सांगण्यास अ‍ॅपलने नकार दिला आहे.