आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या शिबिरांवर हल्ले करू - पाकिस्तानी तालिबान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर - अमेरिका, संयुक्त राष्ट्राने काश्मिरातील भाजपप्रणीत हिंदू दहशतवाद तत्काळ रोखावा, अन्यथा काश्मिरातील भाजपच्या प्रशिक्षण शिबिरावर हल्ले करू, अशी धमकी पाकिस्तानी तालिबानने दिली आहे. काश्मिरातील भारत सरकारचा दहशतवाद आणि भाजप-संघाच्या दहशतवादाला तालिबान चोख उत्तर देईल, असे हा प्रवक्ता म्हणाला.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’च्या वेबसाइटला तेहरीक-ए-तालिबानचा प्रवक्ता एहसानुल्लाह एहसान याने बुधवारी खास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाचा हवाला दिला. तो म्हणाला, काश्मिरातील निरपराध मुस्लिमांना मारण्यासाठी हिंदू दहशतवाद्यांना सरकारी पाठबळ मिळते याची जाहीर कबुलीच भारताच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे.

गृहमंत्र्यांनी उल्लेख केलेल्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर ड्रोन हल्ले करावेत आणि अमेरिका तसेच संयुक्त राष्ट्राच्या फौजांनी काश्मीरवर आक्रमण करून ही शिबिरे उद्ध्वस्त करावीत, असे एहसान म्हणाला. काश्मिरातील भारत सरकारप्रणीत दहशतवाद आणि मुस्लिमांविरोधातील भाजप-संघाच्या दहशतवादाला रोखण्यासाठी अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राने पुढाकार घेतला नाही तर पाकिस्तानी तालिबान या शिबिरांवर हल्ले करेल, अशा शब्दांत एहसान याने धमकी दिली.
प्रॅक्टिकल जिहाद
काश्मिरातील जिहाद हे केवळ ‘नाटक’ असून काश्मिरी मुस्लिमांच्या मुक्तीसाठी प्रॅक्टिकल जिहाद हवा आहे. भारत सरकारचा दहशतवाद आणि हिंदू संघटनांच्या दहशतवादाविरोधात पाकिस्तानी तालिबानच्या क्षमतेचा लवकरच प्रत्यय येईल, असे एहसान म्हणाला.