आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्ये पोलिस मुख्यालयावर हल्ला, 14 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो-इजिप्तमधील पोलिस मुख्यालयावर मंगळवारी कार बॉम्ब हल्ला झाला. त्यात 14 जण ठार तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. देशातील लोकशाही व्यवस्थेच्या संक्रमण काळात राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी ‘मुस्लिम ब्रदरहुड’ ने ही कृती केल्याचा आरोप आहे. दरम्यान, इजिप्त सरकारने मुस्लिम ब्रदरहुड संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.उत्तर कैरोमधील मनसौरा शहरात पोलिसांचे अनेक मजली मुख्यालय आहे. इमारतीमध्ये सोमवारी रात्री एकच्या सुमारास हा हल्ला झाला. त्यात किमान 14 जण ठार झाले. जखमींची संख्या 134 वर पोहोचली आहे.