आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attacker Of Mushraff Released Due To Insufficiant Evidents

मुर्शरफवर हल्लाचा कट करणा-या आरोपी पुराव्या अभावी सुटला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्याच्या आरोपीची गुरुवारी पाकिस्तानी न्यायालयाने पुराव्याअभावी सुटका केली. 2003 मध्ये मुशर्रफ यांना लक्ष्य करण्यासाठी आत्मघाती हल्ला झाला होता. त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता.


राणा फकील हुसेन असे सुटका झालेल्या आरोपीचे नाव असून त्याला 8 डिसेंबर 2005 रोजी त्याच्या कुटुंबातील एकूण 13 जणांसह अटक झाली होती. त्यात सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. आत्मघाती हल्ल्यात सामील असल्याचा ठपका त्याच्यावर होता. पोलिस ठाण्याच्या समोर स्फोटकांनी भरलेले वाहन पार्क केल्याचाही आरोप त्याच्यावर होता.