आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी वकिलातीवर हल्ला :तुर्कीची राजधानी अंकारामधील घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकारा - तुर्कीची राजधानी अंकारामध्ये शुक्रवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 2 जण ठार झाले. मृतांमध्ये एक हल्लेखोर आणि एका सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने घेतलेली नाही. हल्ला दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी झाला. त्यात एक तुर्की नागरिक जखमी झाला आहे. स्फोटात इमारतीचेही नुकसान झाले आहे. स्फोटानंतर राजदूत कार्यालयातील कर्मचा-यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, असे अमेरिकी राजदूत फ्रान्सिस जे. रिकीयॉर्डन यांनी सांगितले. घटनेनंतर रस्त्यावर ढिगारे जमा झाले आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी धुराचे लोट दिसू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनी हा मार्ग बंद केला आहे.