आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एक्स-रे’ हल्ल्यातून ओबामांना मारण्याचा कट फसला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकी राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना एक्स-रे किरणांद्वारे ठार करण्याचा कट एफबीआयने उधळून लावला आहे. एक्स-रे किरणांमध्ये अत्यंत घातक किरणे सोडणे व रिमोटद्वारे ही किरणे डागण्याचे तंत्र काही संशयितांनी प्राप्त केले होते, असा दावा एबीसी न्यूजच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आला आहे.
एक्स-रे किरणांच्या तंत्रज्ञानातून ओबामा यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. त्यासाठी ग्लँडेन स्कोट क्रॉफोर्ड आणि एरिक जे. फ्राइड या आरोपींनी घातक शस्त्रे विकसित केल्याचा दावा अमेरिकी तपास संस्था एफबीआयने केला आहे. बोस्टन हल्ल्यासाठी ओबामाच जबाबदार असल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. हा हल्ला त्यांच्या धोरणाचाच परिणाम आहे, असे क्रॉफोर्ड म्हणाला.


मुस्लिमांना विनाचौकशी अमेरिकेत आणण्यात यावे, असे निर्देश ओबामा यांनी दिले होते. क्रॉफोर्ड कू क्लास क्लानचा (अमेरिकेतील गो-यांची कट्टरपंथीय संघटना) सदस्य आहे. त्याने आपल्या शस्त्राला ‘हिरोशिमा ऑन ए लाइट स्विच’ नाव ठेवले होते, असे एफबीआय अधिका-यांचे म्हणणे आहे. एफबीआयने गेल्या हिवाळ्यात क्रॉफोर्डविरुद्ध चौकशी सुरू केली होती. इस्रायली शत्रूंना झोपेत ठार करता येऊ शकणा-या तंत्राच्या शोधापायी क्रॉफोर्ड त्या वेळी यहुदी प्रार्थनास्थळात गेला होता, असे चौकशीत पुढे आले. जीई कंपनीत उपकरणाची अंतिम जुळवाजुळव करण्यासाठी गेलेल्या क्रॉफोर्ड व एरिक यांची ही योजना अयशस्वी ठरली. गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना त्या वेळी अटक करण्यात आली. गुन्हा कंपनी कार्यालयात झाला होता यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही, असे जीई पॉवर अँड वॉटर कंपनीचे संवाद संचालक जिम हॅली यांनी म्हटले आहे.