आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणा-या आयुर्वेदिक औषधांमध्ये असलेल्या विषारी अॅरिस्टोलोसिक आम्लामुळे लक्षावधी लोकांचे मूत्रपिंड निकामी आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोका वाढला असल्याचा इशारा एका अध्ययनात देण्यात आला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या आयुर्वेदिक औषधांमुळे लक्षावधी लोकांना गंभीर आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत, असे लंडनच्या किंग्ज कॉलेजचे संशोधक प्राध्यापक ग्रॅहम लॉर्ड यांनी म्हटले आहे. सडपातळपणा, अस्थमा आणि अर्थायटिससारख्या आजारावरील उपचारासाठी तयार करण्यात येणारी आयुर्वेदिक औषधे अॅरिस्टोलोसिक हे विषारी आम्ल असलेल्या वनस्पतींच्या मिश्रणापासून तयार करण्यात येतात. या औषधांवर अमेरिकेसह काही युरोपियन राष्ट्रांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मात्र चीन आणि आशियातील अन्य देशांमधून ती अजूनही आणली जातात तसेच ती इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. शास्त्रज्ञांनी अॅरिस्टोलोसिक आम्ल असलेली औषधे सेवनामुळे अॅरिस्टोलोसिक अॅसिड नेप्रोपॅथी प्रकारच्या मूत्रपिंड निकामी होण्याचा प्रकरणांचा अभ्यास केला. आशिया खंडातील देशांमध्ये या विकाराचे हजारो प्रकरणे आहेत.
ते तर सर्पदंशाचे औषध- अॅरिस्टोलोसिया हे एक पारंपरिक आयुर्वेदिक औषध असून सर्पदंशानंतर सापाचे विष उतरवण्यासाठी ते वापरण्यात येते. अर्थायटिससारख्या अन्य कोणत्याही उपचारात त्याचा वापरच करण्यात येत नाही.- डॉ. निर्मला देवी, आयुर्वेद तज्ज्ञ
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.