आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आणि पुरुषांना डेटिंगचे भिन्न नियम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - महिला आणि पुरुषांसाठी डेटिंगचे नियम सारखेच असतील, असा आपला एक समज असतो. परंतु दोघांचे नियम वेगवेगळे असतात, असे एका संशोधनातून लक्षात आले आहे. महिलांना बारमध्ये जायला आवडत नसले तरी पुरुषांना अनेकवेळा महिलांचे बार किंवा क्लबमध्ये जाणे आवडते. अशा मतभिन्नतेमुळे ऑस्ट्रेलियातील अभ्यासात डेटिंगचे नियमही वेगवेगळे असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी 1 लाखाहून अधिक महिला-पुरुषांचा अभ्यास करण्यात आला.