आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian 109 Year Old Grandfather Making Sweater For Penguine

ऑस्ट्रेलियातील आजोबा १०९ व्या वर्षी पेंग्विनसाठी विणतात रंगीबेरंगी स्वेटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिलिप आयलँड (ऑस्ट्रेलिया) - कुटुंबातील लहानग्यांसाठी आजी स्वेटर विणताना आपण पाहिले असेल. मात्र, ऑस्ट्रेलियातील १०९ वर्षाचे आजोबा अल्फ्रेड फिलिप नातवांऐवजी पेंग्विनसाठी सुंदर स्वेटर विणतात. ते या वयातही गोल्फ खेळतात आणि १९३० पासून ते लोकर विणण्याचे काम करत आहेत.
सन २०१३ मध्ये व्हिक्टोरिया फिलिप आयलंड पेंग्विन फाउंडेशनने त्यांच्याकडे स्वेटर विणण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांनी त्यास होकार दर्शवला. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत पेंग्विनसाठी स्वेटर विणणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.