आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Chef Kills, Dismembers And Boils Girlfriend News In Marathi

गर्लफ्रेंडची हत्‍या करुन स्टोव्‍हवर भाजले बॉडीचे पार्ट्स , नंतर केली आत्‍महत्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः गर्लफ्रेंडसमवेत आरोपी शेफ)
सिडनी (ऑस्ट्रेलिया) - ब्रिस्बेन मध्‍ये एका आचा-याने गर्लफ्रेंडची हत्या करुन तिचे बॉडीपार्ट्स स्‍टोव्‍हवर भाजल्‍याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नंतर आरोपीनेही आत्‍महत्‍या केली.
असे झाले प्रकरण उघड
शनिवारी आरोपीच्‍या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्‍याने शेजा-यांनी पोलिसांमध्‍ये तक्रार केली. पोलिसानी घरावर छापा मारल्‍यानंतर तेथे खून झाल्याचे उघड झाले. आरोपीने प्रेयसीचा खून करुन तिच्‍या बॉडीचे पार्ट्स स्‍टोव्‍हवर भाजले असल्‍याचे ऑस्‍ट्रेलियाचे दैनिक ‘कूरियर मेल’ यांने दिले आहे. आरोपी एक जहावार कुकचे काम करत होता. फ्लॅटमध्‍ये तो इंडोनशियाच्‍या गर्लफ्रेंडसोबत राहत होता.
कचराकुंडीत मिळाले आरोपीचे शरीर
‘कूरियर मेल’ या दैनिकाने प्रसिध्‍द केलेल्‍या वृत्‍तानुसार, पोलिसांनी छापा मारताच आरोपी मागील दरवाज्‍याने पळून गेला होता. पळतानाच त्‍याने स्‍वताचा गळा कापण्‍याचा प्रयत्‍न केला होता. नंतर त्‍याचे शव कचराकुंडीमध्‍ये आढळले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, आरोपी आणि त्‍याच्‍या प्रेयसीचे छायाचित्रे...