आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Australian Parliamentary Election Held On 7th Semptember

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियाच्या संसदीय निवडणुकीची तारीख जाहीर, 7 सप्‍टेंबरला होणार निवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - लेबर पक्षाच्या नेतृत्वाची धुरा हाती घेऊन जेमतेम पाच आठवडे झालेले असतानाच ऑस्ट्रेलियन पंतप्रधान केविन रुड यांनी संसदीय निवडणुकीची तारीख जाहीर केली. 7 सप्टेंबरला पुढील निवडणूक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


रूड यांनी पक्षातील सहका-यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये ही भूमिका मांडली आहे. सध्या ऑस्ट्रेलिया बेरोजगारीच्या समस्येचा मुकाबला करत आहे. या समस्येवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. दरम्यान, रुड यांनी गव्हर्नर जनरल यांच्याशी रविवारी दुपारी चर्चा केली. काही महिन्यांपूर्वी गव्हर्नर जनरल यांनी संसद विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार 7 सप्टेंबरला निवडणूक घेण्याची सूचना होती. आता याबाबतचा निर्णय ऑस्ट्रेलियन जनतेने घ्यायचा आहे. देशाचे भवितव्य त्यांच्याच हाती आहे, असे सूचक वक्तव्य रुड यांनी केले.


काय आहेत कारणे ?
देशातील सरकार अस्थिर होण्यामागील मुख्य कारण म्हणून बेरोजगारीकडे पाहिले जाते. 2013-14 या वर्षात बेरोजगारी 6.25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. कर महसुलातील तूटही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्याचा फटका सरकारी तिजोरीवर झाला आहे. देशातील सुमारे 8 लाख नागरिक येत्या काही महिन्यांत बेरोजगार होतील.