आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Police Foil Public Beheading Plot By IS Militants, 15 Detained

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी उधळला ISIS दहशतवाद्यांचा कट, करणार होते सार्वजनिक शीरच्छेद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र संग्रहित)
सिडनी - ऑस्ट्रेलियन पोलिसांनी सार्वजनिकरित्या नागरिकांचा शिरच्छेद करण्याचा ISIS शी संलग्न दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. दहशतवादी ऑस्ट्रेलियातील जनतेला लक्ष्य करत असल्याची माहिती स्थानिक गुप्तचर संस्थेला मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून 15 जणांना ताब्यात घेतले, अशी माहिती पंतप्रधान टोनी अबॉट यांनी दिली.

ऑस्ट्रेलियाने प्रथमच राष्ट्रीय पातळीवर अलर्ट घोषीत केला आहे. त्यामुळे हल्ल्याच्या शक्यतांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे इराक आणि सिरियातील ऑस्ट्रेलियन कट्टरपंथीय अशा प्रकारचा हल्ला करू शकतात असे अबॉट म्हणाले. नोव्हेंबरमध्ये ब्रिस्बेन येथे होणा-या जी 20 नेत्यांच्या परिषदेचे आयोजन ऑस्ट्रेलिया करत आहे. इतर देशांमध्ये मुस्लीम दहशतवादी संघटानांबरोबर लढणा-या देशातील नागरिकांबाबात ऑस्ट्रेलियाने चिंता व्यक्त केली आहे. जी 20 परिषदेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे प्रशासनात्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकाराचा परिषदेवर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सिडनी आणि ब्रिस्बेन येथे या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी केलेल्या कारवाईत सुमारे 800 हूनन अधिक जवानांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात हे सर्वात मोठे ऑपरेशन असल्याचे म्हटले जात असून, पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकारानंतर ओमरजान अझारी नावाच्या व्यक्तीला कट रचल्याच्या आरोपाखाली न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची नोव्हेंबरपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हा प्रकार केवळ दहशत पसरवण्यासाठी केला जाणार असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अजूनही सिडनी येथील काही भागांमध्ये छापे टाकले जात आहेत.