आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Scientist Produced 3 D Printed Micre Insect

ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांची थ्रीडी प्रिंटेड सूक्ष्म किड्यांची निर्मिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न - ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी जगातील पहिलेवहिले थ्रीडी प्रिंटेड विशाल टायटेनियम किडे तयार केले असून मूळ आकारापेक्षा या किड्यांचा आकार 50 पट जास्त आहे. मूळ किडे सहजपणे डोळ्यांना दिसत नसल्यामुळे या थ्रीडी प्रिंटेड किड्यांच्या साह्याने त्यांचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे.


डोळ्यांना न दिसणा-या या किड्यांचा तपशीलवार अभ्यास करता यावा, हा सीएसआयआरओच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या तंत्रज्ञानामुळे या किड्यांची वैशिष्ट्ये शोधून काढणे सहज शक्य होणार असल्याचे सीएसआयआरओने म्हटले आहे. कॅनबेरा येथील ऑस्‍ट्रेलियन राष्ट्रीय कृमी संग्रहालयातून शास्त्रज्ञांनी हे किडे घेतले. थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकाच्या साह्याने मूळ आकारापेक्षा 50 पट मोठे किडे तयार केले. भविष्यात या किड्यांच्या शरीराची अंतर्गत रचना थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे निर्माण करण्याची शास्त्रज्ञांची योजना आहे.