आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Woman Arrested Trying To Going Syria To Join Jihad

चार मुलांसह \'जिहाद\'साठी जाणा-या ऑस्ट्रेलियन महिलेला विमानतळावर अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - सिरियाच्या युद्धात सहभागी होण्यासाठी जाणा-या एका ऑस्ट्रेलियन महिलेला सिडनी विमानतळावर अटक करण्यात आली. या २९ वर्षीय महिलेबरोबर तिची चार मुलेही होती. ही महिला तिच्या पतीसाठी कपडे आणि रोख रक्कम घेऊन चालली होती, असे अधिका-यांनी सांगितले. तिचा पती सिरियातील युद्धात सहभागी होण्यासाठी गेला आहे.
न्यू साऊथ वेल्स ज्वाइंट काउंटर टेररिझम टीमने या महिलेला विमानात बसताना सिडनी विमानतळावर अटक केली. विमानतळाजवळील मॅस्कॉट पोलिस ठाण्यात नेण्यात आले. महिलेच्या अटकेनंतर मुस्लीम आंदोलकांचा एक गट पोलिस ठाण्याबाहेर जमा झाला होता.
महिलेला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला असून, तिला 2 जून रोजी न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. पोलिसांनी महिलेच्या सिडनी आणि ब्रिस्बेन येथील घरांची झडती घेण्यास सुरुवात केली आहे. अल रिसल्लाह नावाच्या एका फेसबूक पेजवर महिलेचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची बातमी देण्यात आली.
पुढे वाचा : 200 ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत सिरियामध्ये