आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माऊंट एव्हरेस्टवर आलेल्या हिमवादळात 12 शेर्पा मृत्युमुखी तर 3 अद्याप बेपत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू (नेपाळ)- माऊंट एव्हरेस्टवर आलेल्या हिमवादळात जगातिल सर्वांत उंच शिखराच्या रस्त्याचा काही भाग वाहून गेला असून 12 नेपाळी शेर्पा मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेतील 3 शेर्पा अद्याप बेपत्ता असल्याचे समजते.
माऊंट एव्हरेस्टच्या वेबस कॅम्पवर पत्रकारांशी बोलताना नेपाळच्या पर्यटन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी क्रिष्णा लामसल म्हणाले, की कॅम्प 2 च्या खालच्या बाजूला आज (शुक्रवार) सकाळी 6.30 च्या सुमारास भीषण हिमवादळ आले. यावेळी शेर्पा गाईड गिर्यारोहकांसाठी रोप फिक्स करण्यासाठी गेले होते. दुर्घटनेत 12 शेर्पांचा मृत्यू झाला आहे. या हिमवादळात अडकलेल्या इतर शेर्पांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
क्रिष्णा लामसल म्हणाले, की चार शेर्पांचे मृतदेह बर्फाखाली सापडले आहेत. इतर दोन मृतदेह खणून बाहेर काढले जात आहेत. आणखी नऊ शेर्पा अजून बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांचाही मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.