आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाझ शरीफ 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा पाकच्या पंतप्रधानपदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - नवाझ शरीफ 14 वर्षांनंतर पुन्हा पाकच्या पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत. मुशर्रफ यांनी 1999 मध्ये त्यांना पदच्युत केले होते. मात्र, जनतेने त्यांना पुन्हा सत्ता दिली. 272 पैकी 235 जागांचे निकाल जाहीर झाले असून 107 जागा शरीफ यांच्या पक्षाने पटकावल्या. बहुमतासाठी 137चा आकडा त्यांना गाठावा लागेल.

तिसर्‍यांदा पंतप्रधान होत असलेल्या शरीफ यांना मुशर्रफनी फाशी सुनावली होती. मात्र नंतर हकालपट्टीवर निभावले. यंदा मुशर्रफ यांच्या पक्षाला केवळ 2 जागा मिळाल्या. इम्रान खानच्या पक्षाला 32 जागा तर सत्तेत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा पहिला पक्ष ठरलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला केवळ 28 जागा मिळवता आल्या.

संबंध सुधारणार? : मैत्रीचे संबंध 1999 मध्ये जिथे थांबले होते तेथून पुन्हा प्रारंभ होईल. डॉ. मनमोहनसिंग यांनीही शरीफ यांचे अभिनंदन करून भारतभेटीचे निमंत्रण दिले.

शरीफ नावाचे वादळ : माजी पंतप्रधान राजा अशरफ 60 हजार मतांनी पराभूत झाले. माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांची दोन्ही मुले अली मुसा आणि अब्दुल कादिर पराभूत झाले. सिंध वगळता इतरत्र ‘पीपीचा’ धुव्वा.

इम्रान खानच्या विजयाचा अर्थ : द्विपक्षीय राजकारणात प्रथमच तिसर्‍या पक्षाची शक्ती दिसली. इम्रान 3 जागांवर विजयी झाले. 2002 मध्ये त्यांच्या पक्षाकडे केवळ एकच जागा होती. आता ते विरोधी पक्षनेते होऊ शकतात.

भारतासाठी ते किती शरीफ?

लाहोर कराराचा उल्लेख
भारताशी मतभेदांच्या मुद्दय़ांवर लाहोर करारानुसार तोडगा काढला जाईल, अशी जाहीरनाम्यात हमी. भारताशी मैत्रीलाच प्राधान्य देण्याची घोषणा.

मुंबई हल्ला ही कुरापतच
मुंबई हल्ल्यानंतर नवाझ शरीफ यांनी म्हटले होते की, ‘भारताशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध बिघडवू पाहणार्‍या कोणत्या शक्ती पाकिस्तानात आहेत त्याचा तपास झाला पाहिजे.

निराशा
1997 : शांततेच्या बाता
मात्र, मे 1998 मध्ये भारताच्या आण्विक चाचण्यांना प्रत्युत्तर म्हणून आण्विक चाचणी केली. तेव्हा म्हणाले होते, ‘वाळलेली भाकरी खाऊ पण भारताला चोख प्रत्युत्तर देऊ.’

1999 : समझोता बस सुरू
मात्र, दुसर्‍या बाजूला भारताच्या डोळ्यात धूळफेक करत कारगिलमध्ये पाकिस्तानने युद्ध पुकारले. तेव्हा शरीफच पंतप्रधान होते.