Home | International | China | baba ramdev, k.b.s. ayangar, china, international

‘कपालभाती’ विकून रामदेवांनी योग भ्रष्ट केला; अय्यंगार यांची टीका

वृत्तसंस्था | Update - Jun 23, 2011, 03:02 AM IST

केवळ नऊ दिवसांत उपोषण समाप्त करावे लागणाºया रामदेवबाबा यांच्या शारीरिक क्षमतेवर योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • baba ramdev, k.b.s. ayangar, china, international

    बीजिंग -केवळ नऊ दिवसांत उपोषण समाप्त करावे लागणाऱया रामदेवबाबा यांच्या शारीरिक क्षमतेवर योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही जण कपालभाती विकून पतंजली योग भ्रष्ट करत असल्याची टीकाही अय्यंगार यांनी रामदेवबाबांचे नाव न घेता केली. अय्यंगार यांचे येथे योग शिबिर सुरू असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अय्यंगार यांच्या सन्मानार्थ बीजिंग टपाल विभागाने त्यांचे टपाल तिकीट जारी केले आहे.
    रामदेवबाबा यांनी आठवडाभरात उपोषण संपवल्याने त्यांच्यावर देशभरातील योगगुरूंनी टीका केली होती. योगगुरू शारीरिक आणि मानसिकदृष्टष्ट्या कणखर असतात, काहीही अन्न न घेता ते अनेक दिवस राहू शकतात. त्यामुळे बाबांनी लवकर उपोषण संपवल्याने त्यांच्या शारीरिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Trending