आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baby Child Purchasing Car Over Smartphone In America

अमेरिकेत अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलींने स्मार्टफोनवरून खरेदी केली कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील अवघ्या एक वर्षाच्या मुलीने मोबाइलवर गेम खेळताना ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे कार खरेदी करून टाकली. बाळाकडून झालेल्या अनाहूत खरेदीला तिच्या मम्मी-पप्पांनीही स्वीकारले.


पोर्टलँडच्या (ओरेगॉन) पॉल स्टॉट यांच्या सॉरेला नावाच्या मुलीच्या हातून ऑनलाइन लिलावातील खरेदी कशी झाली, याचा पत्ता त्यांना लागला नाही; परंतु ‘इबे’ संकेतस्थळाकडून आलेल्या संदेशावरून त्यांना याची माहिती मिळाली. तुमचे अभिनंदन ! तुम्ही 1962 सालच्या ऑस्टीन-हिल स्प्राइट कारचे मालक झाला आहात, असा संदेश वाचून पॉल काही क्षण अवाक् झाले. कारची किंमत 225 डॉलर्स (सुमारे 13 हजार 456 रुपये) आहे. आपण तर अशी काही खरेदीची ऑर्डर दिलेली नव्हती, असा विचार करतानाच त्यांना लहान मुलीची आठवण झाली. ती स्मार्टफोनच्या गेममध्ये एवढी का रंगून गेली होती, हे त्यांच्या लक्षात आले. गेम खेळताना तिच्याकडून ‘इबे अ‍ॅप’ लॉग ऑन झाले. त्यानंतर काही क्षणांतच कारची खरेदी झाली. इबेवर ही कार आपण बघितली. सुदैवाने मात्र तिने सुमारे 38 हजार डॉलर्स (22 लाख 71 हजार) रुपयांच्या पोर्श कारची खरेदी केली नाही, असे पॉल यांना वाटते.


ही कार ट्यूलाटीनमध्ये ठेवण्यात आली होती; परंतु आता ती मिलवाकुईमध्ये ठेवण्यात आली आहे. इबेच्या जाहिरातीमध्ये तिची फ्रांकेनस्प्राइट अशी नोंद करण्यात आली आहे. गाडीला दोन इंजिने आहेत. दोन्ही इंजिने मागील आसनाच्या खाली आहेत, असे सॉरेलाची आई ख्रिस्टिना स्टॉट यांनी सांगितले. मुलीच्या हातून चूक झाली म्हणून पॉल व ख्रिस्टी यांनी मनस्ताप करून घेतला नाही. उलट त्यांनी या चुकीला अविस्मरणीय क्षणामध्ये परिवर्तित करण्याचे ठरवले आहे.
एवढे मात्र खरे की, अशी ऑनलाइन चूक पुन्हा होणार नाही, याची खबरदारी ते घेणार आहेत. सॉरेलाने पुन्हा असे काही उद्योग करू नये म्हणून त्यांनी पासवर्ड टाकून घेतला आहे.


सोळाव्या वर्षीची भेट
अनाहूत खरेदीनंतर पॉल व त्यांची पत्नी ख्रिस्टिना यांनी स्पाइट कार तशीच जतन करण्याचे ठरवले आहे. ही कार आपल्या मुलीला तिच्या सोळाव्या वर्षी किंवा महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना भेट म्हणून देण्याचा सुंदर विचार सॉरेलाच्या मम्मी-पप्पांनी करून ठेवला आहे.