आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचे विस्मरण बाळाच्‍या जिवावर बेतले, चिमुकलीचा श्‍वास कोंडल्‍याने मृत्‍यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- कामाच्या घाईत पोटच्या मुलीला कारमध्येच लॉक करून बाहेर पडलेल्या महिलेवर तीन तासांनंतर पश्चात्तापाची वेळ आली. कारण एसयूव्ही कारमधील उष्णतेमुळे तिच्या 11 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.

कॅटी लाँग असे या आईचे नाव आहे. अलाबामा प्रांतातील होमवूड शहरात त्यांच्या व्यवसाय आहे. रविवारी त्या नेहमीप्रमाणे मुलगी गॅब्रिएलास घेऊन एसयूव्ही कारने होमवूडमध्ये दाखल झाल्या होत्या. परंतु घाईघाईत कारध्ये आपण एकटेच आहोत, असे वाटल्याने त्या बाहेर पडल्या व त्यांनी कारचे दार बंद केले. त्या परतल्या त्या वेळी कारचे दार उघडताच मागील सीटवर आपले बाळ पडलेले दिसले. त्यांना धक्काच बसला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारमधील उष्णतेने बाळाचा मृत्यू झाला होता.