आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी मुलांच्या अंगावरून सैतान मारतो उडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्गोस - स्पेनच्या उत्तरेकडील बर्गोसमध्ये नवजात मुलांचे भवितव्य चांगले घडण्यासाठी एक अनोखा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. मुलांवर कोणत्याही दुष्टात्म्याची नजर पडू नये आणि भविष्यातही त्याने चांगल्या मार्गावर वाटचाल करून उत्तम माणूस व्हावे हा त्यामागचा हेतू आहे. या परंपरेनुसार आईवडील आपल्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन स्पेनच्या कॅस्ट्रिलो दि मुर्सिया गावात एका पवित्र स्थळी एकत्र येतात आणि हे वार्षिक धार्मिक अनुष्ठान पूर्ण करतात.

सैतान करतो चांगले काम
अला कॉलाछो असे या स्पॅनिश सैतानाचे नाव आहे. तो खुल्या आकाशाखाली झोपवलेल्या नवजात मुलांच्या अंगावरून उडी मारून त्यांच्यावरील वाईट प्रवृत्ती पळवून लावतो, अशी धारणा आहे. छायाचित्रातील उडी मारणारी व्यक्ती सैतानाचे प्रतिनिधित्व करते. ती पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करते. अशा प्रकारे सैतानच चांगले काम करतो.

पोपनी केला होता विरोध
पूर्ववर्ती पोप बेनेडिक्ट 16 यांनी या उत्सवाला पूर्णपणे विरोध केला होता. त्यांनी स्पॅनिश धर्मगुरूंना या उत्सवापासून चार हात दूर राहण्यास सांगितले होते, पण अजूनही तो साजरा केला जातो. अर्थात, हा उत्सव कधी आणि का सुरू झाला याची कुठलीही माहिती नाही, पण तो अत्यंत धामधुमीत साजरा केला जातो.

1621 पासून हा उत्सव सुरू आहे.
04 दिवस चालतो हा उत्सव.
500 या गावाची लोकसंख्या.
12 महिन्यांपर्यंतची मुले होतात सहभागी.

पुढील स्लाइडमध्ये या उत्सवाची आणखी छायाचित्र...