आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लहान मुलांना भूतांपासून वाचवण्‍यासाठी स्पेनमध्‍ये साजरा केला जातो \'जम्पिंग फेस्टिव्हल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बेबी जम्पिंग उत्सवाच्या दरम्याने लहानग्यांवरून उडी मारताना भूते) - Divya Marathi
(बेबी जम्पिंग उत्सवाच्या दरम्याने लहानग्यांवरून उडी मारताना भूते)
बरगॉस - स्पेनच्या उत्तरेकडील बरगॉसमध्‍ये नवजात बालकांच्या चांगल्या भविष्‍याकर‍िता एक उत्सव साजरा करण्‍याची परंपरा आहे. त्यास 'बेबी जम्पिंग फेस्टिव्हल' असे म्हटले जाते. मुलांवर कोणत्याही प्रकारच्या वाईट आत्म्यांचा प्रभाव पडू नये आणि भविष्‍यात तो चांगल्या मार्गावर चालेल असा उत्सव साजरा करण्‍यामागील उद्देश आहे. त्याचा एक भाग म्हणून आई-वडील आपल्या एका वर्षाच्या मुलांना घेऊन स्पेनच्या कॅस्ट्रिलो दी मुर्सिया गावात एका पवित्र ठ‍िकाणी एकत्र जमतात आणि वार्षिक धार्मिक विधी पूर्ण केले जातात.

भूत करतात चांगले कामे
स्पेनमध्‍ये अल कॉलाछो नावाचा भूत खुल्या आकाशाच्या खाली झोपवण्‍यात आलेल्या नवजात बालकांवरून उडी मारतो. असे केल्याने त्या बालकांवर असलेल्या वाईट शक्ती लांब पळून जातात. तुम्हाला येथे छायाचित्रात उड्या मारताना दिसत असलेला व्यक्ती हा भूताचे प्रतिनिधीत्व करतो. ते पिवळ्या रंगाचे वस्त्रे परिधान करतात. अशा पध्‍दतीने भूतेही चांगले काम करतात.

पोपने केला होतो विरोध
16 वे पोप बेनेडिक्ट यांनी अशा प्रकारच्या उत्सवास विरोध केला होता. त्यांनी स्पॅनिश धर्म अनुयायांना उत्सवापासून लांब राहण्‍याचा सल्ला दिला होता. तरीही तो साजरा करण्‍यात आला. हा उत्सव कधी आणि का सुरू झाला याविषयी कोणतीही माहिती मिळत नाही. पण तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो्.

एक नजर वस्तुस्थितीवर
* 1621 पासून ही परंपरा चालत आली आहे.
* हा उत्सव चार दिवसांपर्यंत चालतो.
* 12 महिन्यांची मुले सहभागी होतात.
* या गावाची लोकसंख्‍या 500 इतकी आहे.
पुढे पाहा या अनोख्‍या परंपरेची झलक....