आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baghdad Celeberates As Iraq Lifts 12 Years Old Curfew

PHOTOS: तब्‍बल 12 वर्षांनंतर हटविला कर्फ्यू, बगदादमध्‍ये आनंदी आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- इराकची राजधानी बगदादममध्ये तब्‍बल 12 वर्षांपासून कर्फ्यू लावण्‍यात आलेला होता. रविवारी कर्फ्यू काढून घेतल्‍याची घोषणा पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी केली. या निर्णयामुळे लोकांनी रस्‍त्‍यावर येऊन नृत्‍य करुन, गीत गाऊन आनंद व्‍यक्‍त केला.
माइक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरव र लोकांनी आनंद व्‍यक्‍त करण्‍याची छायाचित्रे पोष्‍ट केली आहेत. 2003 मध्‍ये बगदादमध्‍ये कर्फ्यू लावण्‍यात आला होता. अमेरिकेच्‍या हल्‍ल्‍यापासून वाचण्‍यासाठी शहरात कर्फ्यू लावण्‍यात आला होता असे पंतप्रधान कार्यालयातील अधिका-यांनी सांगितले.
दहशतवादी हल्‍ले आणि बॉम्‍बवर्षाव हे बगदादमधील लोकांचे नित्‍यमियमाचे झाले होते. परंतु, शासनाने कर्फ्यू हटविण्‍याचा निर्णय घेतल्‍यानंतर लोकांमध्‍ये आनंदाचे वातावरण आहे. उल्‍लेखनिय म्‍हणजे शासनासमोर इस्लामिक स्टेटचा कसा सामना करवा हा यक्ष प्रश्‍न असेल.
पुढील स्‍लाइडवर पाहा, आनंद व्‍यक्‍त करताना लोकांची छायाचित्रे..
(स्रोत: ट्विटर )