आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baikonur Cosmodrome Old Launching Station In This World

बॅकानूर कॉस्मोड्रोम जगातील सर्वात जुने लाँचिंग स्टेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाची राजधानी मॉस्को येथून 2100 किलोमीटर दूर, कझाकिस्तानच्या वाळवंटात बॅकानूर कॉस्मोड्रोम विकसित करण्यात आले आहे. हे जगातील सर्वात जुने व महत्त्वाचे स्पेस लाँचिंग स्टेशन आहे. सोव्हिएत रशियाच्या काळात 1950 मध्ये याची निर्मिती करण्यात आली. अंतराळ मोहिमांसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरले. 1955 मध्ये सोव्हिएत संघाने येथे गुप्तरीत्या वैज्ञानिक संशोधन चाचणी केंद्रही उभारले होते. या केंद्राद्वारे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आली होती. या रेंजला नंतर एसटीआर नंबर 5 च्या नावाने ओळखण्यात येऊ लागले.
अंतराळाविषयी आपल्या जाणिवा वाढवण्यात या स्थानकाचे फार महत्त्व आहे. 1957 मध्ये स्पुटनिक उपग्रहाचे लाँचिंग येथूनच झाले होते. अंतराळात जाणारे पहिली व्यक्ती युरी गागारीन यांच्या यात्रेलाही याच भूमितून सुरुवात झाली होती. कालांतराने येथील मोहिमांचे प्रमाण कमी होत गेले. मात्र आजही ही जागा मोहिमासाठी सर्वोत्तमच आहे. विस्तीर्ण क्षेत्र असलेले हे एकमात्र स्थळ आहे. पूर्वेस 200 किमी अंतरावर एरल समुद्र व उत्तरेस सायर दारया नावाची नदी आहे. कॉस्मोड्रोमचा परिसर 7,650 वर्ग किमीच्या परिसरात आहे. हे क्षेत्र कझाकिस्तानचे असले तरीही, यावर 2050 पर्यंत रशियाची मालकी असणार आहे. येथूनच रशियाच्या अंतराळ मोहीमांचे आयोजन केले जाते.
लाँचिंग स्टेशन वाळवंटातच का?
येथे लॉजिस्टिक रेल्वे नेटवर्क आहे. याच्या माध्यमातून अंतराळ यानाला किंवा उपग्रहाला लाँचिंग स्टेशनपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होते. स्पेस लाँचिंग स्टेशनसाठी या जागेची निवड वरिष्ठ सैन्य अधिकारी व युद्धसामग्री विशेषज्ञ व रॉकेट अभियंत्यांद्वारे करण्यात आली. या जागी पृथ्वीची प्रदक्षिणा गती योग्य आहे. येथे विस्तीर्ण मैदान आहे. कझाकिस्तानमधील त्युरातम गाव येथून जवळ आहे. सोव्हिएत रेडिओची युनिकेशन सिस्टिम येथेच आहे.